जम्मूत गुरुवारी सकाळी जो ग्रेनेड हल्ला करण्यात आला त्यामागे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने घडवला असल्याची माहिती पोलीस महासंचालक मनिष सिन्हा यांनी दिली आहे. हिज्बुलचा दहशतवादी फारूख अहमद भट उर्फ ओमर याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गु्न्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती सिन्हा यांनी दिली आहे.

जम्मूमधील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्या प्रकरणा एकाला अटक करण्यात आली होती. या अटकेची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे. घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी ही कारवाई केली.