जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे पोलिसांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा डाव उधळून लावत, हिजबुल मुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून आयडी स्फोटक देखील जप्त करण्यात आली आहेत.

या दहशतवाद्यांची पोलिसांच्या व जवानांच्या शोधमोहिमेच्या मार्गावर स्फोटक लावून हल्ला घडवून आणण्याची योजना होती. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.