05 August 2020

News Flash

जवानांबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुलचा टॉप दहशतवादी ठार

सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार झाला.

संग्रहीत छायाचित्र

सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार झाला असून त्याचा साथीदार निसटण्यात यशस्वी ठरला. जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी ही चकमक झाली आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याचा हिजबुलच्या टॉपच्या अतिरेक्यांमध्ये समावेश होतो. डोडा जिल्ह्याच्या गोंदाना पट्टयात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली.

लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी ही माहिती दिली. या भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा पथकांना मिळाली होती. चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा हारुन वानी हा दहशतवादी ठार झाला. ए प्लस कॅटगरीच्या दहशतवाद्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता.

त्याच्यासोबत असलेला दुसरा दहशतवादी बर्फाळ भागात पळाला असून त्याला पकडण्यासाठी शोध मोहिम सुरु आहे. एके-४७ रायफल, तीन मॅगझीन, चिनी ग्रेनेड आणि रेडिओ सेट त्याच्याकडे सापडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 5:35 pm

Web Title: hizbul terrorist killed in encounter with security forces in jammu kashmir dmp 82
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : १५ लाखांचा इनाम असलेल्या ‘हिजबुल’च्या कमांडरचा खात्मा
2 हल्ला केला तर चीनला मोठी किंमत मोजावी लागेल, तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा
3 निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला फाशी नाही….
Just Now!
X