News Flash

‘टायटॅनिक’च्या जॅकला चेन्नईतील पाणीसंकटाची चिंता

अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोने पोस्ट लिहून चिंता व्यक्त केली आहे

टायटॅनिक या सिनेमातील जॅक डाऊसन्स ही भूमिका करून जगभरात पोहचलेला अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ याने चेन्नई येथील पाणी संकटाबाबत चिंता व्यक्त केली आहे. बीबीसीने चेन्नईबाबत दिलेली एक बातमी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिओनार्डो डिकॅप्रियोने आपली काळजी व्यक्त केली आहे. फक्त पाऊसच चेन्नईला या परिस्थितीतून वाचवू शकतो या आशयाचा मथळा या बातमीला देण्यात आला आहे. अनेक बायका एका विहीरीवर पाणी भरण्यासाठी आल्या आहेत, मात्र खोलवर पाणीच नाही आणि ते मिळावं ही प्रत्येकाचीच अपेक्षा आहे या आशयाचा चेन्नईतला फोटो बातमीसाठी वापरण्यात आला आहे. ही बातमी आणि हा फोटो इंस्टाग्राम अकाऊंवटर शेअर करत लिओनार्डेने चिंता व्यक्त केली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 7:01 am

Web Title: hollywood actor leonardo dicaprio post on instagram about chennai water crisis scj 81
Next Stories
1 देशातील हिंसक घटनांबाबत सोयीची भूमिका नको !
2 अमेरिका-चीन व्यापार युद्धात भारताला मोठी संधी
3 ‘एशिया पॅसिफिक’चा भारताला पाठिंबा
Just Now!
X