News Flash

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा वाढदिवस, मोदी म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शहा यांचा आज वाढदिवस

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायूष्य देवो अशा शब्दात मोदींनी शाह यांना शुभेच्छा दिल्यात.

कर्मठ, अनुभवी, कुशल संगठनकर्ता आणि मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अमित शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायू आणि प्रकृती नेहमी उत्तम ठेवो, असं ट्विट मोदींनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्याकडून अशाच प्रकारे देशाची सेवा होत राहो, असं गडकरींनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही शाह यांना शुभेच्छा देताना दिर्घायुष्याची प्रार्थना केली आहे. याशिवाय अन्य अनेक नेत्यांनी शाह यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित शाह यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 साली झाला. आज ते 55 वर्षाचे झालेत. त्यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 9:16 am

Web Title: home minister amit shah 55th birthday pm narendra modi wishes sas 89
Next Stories
1 दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही
2 पाकिस्तानची भारताला पुन्हा अणुहल्ल्याची धमकी
3 रेल्वेच्या विलंबामुळे प्रवाशांना १ लाख ६२ हजार रूपयांची भरपाई
Just Now!
X