News Flash

१९६२ पासूनची चर्चा करु हिंमत असेल तर संसदेत या, राहुल गांधींना अमित शाह यांचं आव्हान

काँग्रेसचा नेता असा आहे ही त्यांच्या पक्षासाठी दुर्दैवी

गलवान खोऱ्यात जो संघर्ष झाला त्यावरुन राहुल गांधी यांनी ‘Surender Modi’ असा ट्विट केला. या ट्विटचा अमित शाह यांनी चांगलाच समाचार घेतला. जर चर्चाच करायची असेल तर संसदेत या, १९६२ पासून आजपर्यंत काय काय घडलं त्यावर चर्चा करु असं आव्हानच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दिलं आहे. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष अत्यंत घाणेरडं राजकारण करत आहेत याची मला कीव येते आहे. काँग्रेसच्या नेत्याची ट्विट्स पाकिस्तान आणि चीनला आवडत आहेत ही बाब दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्षासाठी हा चिंतेचा विषय आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

करोनाच्या परिस्थितीवर राहुल गांधी जी टीका करत आहेत त्यालाही अर्थ नाही-शाह

करोनाची लढाई भारताने अत्यंत स्थैर्याने आणि धैर्याने लढली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात करोनाची लढाई अत्यंत धैर्याने आपण लढलो आहोत. जगाच्या तुलनेत आपण करोनाशी अत्यंत उत्तमरित्या लढलो आहोत. आपल्याकडे परिस्थिती जगाच्या तुलनेत बरीच नियंत्रणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आणि दिवे लावले गेले, घंटा वाजवल्या गेल्या. एकाही पोलिसाशिवाय कर्फ्यू पाळला गेला. यासारखी बाब मी तरी माझ्या कारकिर्दीत पाहिलेली नाही. हे सगळं मोदींच्या नेतृत्त्वामुळे शक्य झालं आहे असं गृहमंत्री अमित शाह यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनापुढे हात टेकले हे म्हणणं साफ चुकीचं आहे असं म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 1:36 pm

Web Title: home minister amit shah gave answer to rahul gandhi on his surender modi post scj 81
Next Stories
1 चायनीज कंपनीनं PM फंडासाठी दिले सात कोटी रुपये
2 मोदींनी काँग्रेसच्या ‘या’ माजी पंतप्रधानांचं केलं कौतुक
3 लहान मुलांनी आजी आजोबांची मोबाइलवर मुलाखत घ्यावी, मोदींचं आवाहन
Just Now!
X