News Flash

निसर्ग चक्रीवादळ : अमित शाह यांची उद्धव ठाकरे, विजय रुपाणी यांच्याशी चर्चा; परिस्थितीचा घेतला आढावा

एनडीआरएफच्या टीम महाराष्ट्र, गुजरातकडे रवाना

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तसंच त्यांनी उद्धव ठाकरे आणि विजय रुपाणी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गृहमंत्र्यांनी आपात्कालिन परिस्थितीचा सामना करणाऱ्या टीमसोबतही त्यांनी चर्चा केली. निसर्ग चक्रीवादळाबाबत महाराष्ट्र आणि गुजरातला अलर्ट देण्यात आला आहे. हे वादळ वायव्य दिशेकडे वाटचाल करत असून ते ३ जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

निसर्ग या चक्रीवादळाची तीव्रता पुढील ४८ तासांमध्ये वाढू शकते. वायव्य दिशेकडे वाटचाल करत असून ते ३ जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीवर २ ते ४ जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसंच कोकणातल्या काही भागांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. तसंच त्यांनी दोन्ही राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. दरम्यान, एनडीआरएफच्या २१ टीम दोन्ही राज्यांमध्ये पाठवण्यात आल्या असून १० टीम स्टॅंडबायवर ठेवण्यात आल्याची माहिती नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे व्यवस्थापकीय संचालक एस.एन.प्रधान यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 10:03 pm

Web Title: home minister amit shah speaks with maharashtra cm uddhav thackeray gujrat vijay rupani nisarga cyclone jud 87
Next Stories
1 ‘केवळ खांदा द्यायलाच येणार का?’; अमेठीत स्मृती इराणींविरोधात पोस्टरबाजी
2 राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जून रोजी निवडणुका; त्याच दिवशी जाहीर होणार निकाल
3 इच्छा तिथे मार्ग ! एका मुलीला परीक्षेला जाण्यासाठी केरळ सरकारने चालवली ७० आसनी बोट
Just Now!
X