24 September 2020

News Flash

‘जन जागरण अभियान’साठी अमित शाह २२ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार

कलम ३७० च्या निर्णयाबाबत केली जाणार जनजागृती

जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवण्यात आल्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून देशभर ‘जन जागरण अभियान’ आयोजीत करण्यात आले आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह २२ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत.

अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र भाजपाकडून एका विशेष महासभेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. भाजपाच्या या ‘जन जागरण अभियान’ चा उद्देश जनतेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने का घेतला, हे पटवून देणे असा आहे.

कलम ३७० पंतप्रधान मोदी सरकाने हटवल्यांतर सातत्याने काँग्रेसकडून टीक केली जात आहे. या मुद्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते अनेक विधानं देखील करत आहेत. याच पार्श्वभूमीवर व महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पाहता भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह आता मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे . माध्यमांच्या माहितीनुसार, भाजपाच्यावतीने ‘जन जागरण अभियान’ अंतर्गत देशभरात ३५ सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 8:04 pm

Web Title: home minister amit shah to hold jan jagran abhiyaanin in mumbai msr 87
Next Stories
1 ISRO ने चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरबद्दल दिली महत्वाची माहिती
2 VIDEO:चंद्रावरच्या कातरवेळेमुळे विक्रम लँडरचे फोटो मिळाले नाही?
3 काँग्रेसच्या मंत्रीमहोदयांनी ओलांडली टीकेची पातळी, पंतप्रधान मोदींवर केला हा भयानक आरोप
Just Now!
X