22 April 2019

News Flash

‘चौकीदार प्युअर है, फिर से पीएम बनना शुअर है’

चौकीदार चोर नाही, प्युअर आहेत. पुढच्या वेळी त्यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने आपल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना चौकीदार चोर है असल्याची टीका करतात. त्यांच्या या टीकेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव करताना ते म्हणाले की, चौकीदार चोर नाही तर प्युअर आहेत. पुढच्यावेळी ते पुन्हा एकदा पंतप्रधान होणे शुअर आहे, असे म्हटले. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे ते बोलत होते.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष पंतप्रधानांवर चौकीदार चोर है, असे आरोप करत असतात. मी सांगू इच्छितो की, चौकीदार चोर नाही, प्युअर आहेत. पुढच्या वेळी त्यांचे पंतप्रधान बनणे निश्चित आहे आणि भारताच्या समस्यांचे तेच उत्तर आहेत.

दरम्यान, राफेल व्यवहारावरून राहुल गांधी सातत्याने भाजपा आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना दिसतात. राहुल नेहमी आपल्या रॅलीत चौकीदार चोर है ची नारेबाजी करत असतात. सोमवारीही त्यांनी लखनौ येथील रॅलीत याच घोषणा दिल्या होत्या.

First Published on February 11, 2019 10:07 pm

Web Title: home minister rajnath singh slams congress president rahul gandhi on chowkidaar chor hai statement