News Flash

अदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी देण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश

केंद्रिय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार

(संग्रहित छायाचित्र)

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सुरक्षा देणार असल्याचे आदेश आज गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्रिय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार आहे.

अदर पुनावाला यांची सिरम इन्स्टि्युट ऑफ इंडिया ही संस्था भारतातली कोविशिल्ड ही लस उत्पादन करते.

वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत ११ सुरक्षा अधिकारी असतात. अदर यांना देशभरात ही सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे. गृहमंत्रालयाने यासंदर्भातले आदेश दिल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

दरम्यान, अदर यांनी आजच त्यांच्या संस्थेकडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोविशिल्ड या लशीची नवी किंमत जाहीर केली.सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीची किंमत आता १०० रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी ही लस राज्य सरकारांना ४०० रुपयांना मिळत होती. आता ती ३०० रुपयांना मिळणार आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी आजच ही माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 7:42 pm

Web Title: home ministry will provide y security to adar poonawala vsk 98
Next Stories
1 व्लादिमिर पुतिन यांच्याशी मोदींची फोन पे चर्चा; मानले मित्राचे आभार!
2 आजोबांसाठी ऑक्सिजन हवा असल्याचं पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात UP पोलिसांनी नोंदवला गुन्हा
3 Covishield vaccine: लसीची किंमत १०० रुपयांनी कमी केली, आदर पुनावाला यांची घोषणा
Just Now!
X