17 February 2020

News Flash

ऑनर किलिंगच्या घटनेत मुलीचा खून, मुलाची आत्महत्या

बुधाना शहरात ऑनर किलिंगच्या एका घटनेत एकोणीस वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी ठार केले, तर तिच्या मित्राने आत्महत्या केली.

| May 7, 2014 12:00 pm

बुधाना शहरात ऑनर किलिंगच्या एका घटनेत एकोणीस वर्षांच्या मुलीला तिच्या कुटुंबीयांनी ठार केले, तर तिच्या मित्राने आत्महत्या केली.
सदर मुलगी याच शहरातील मुबारिक हसन (वय २१) या त्याच शहरातील तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्यांच्या संबंधांना तिच्या कुटुंबीयाचा विरोध होता. यावरून झालेल्या वादात काल तिचा गळा दाबून खून करण्यात आला व नंतर तिच्या अहसान व आशू या दोन भावांनी तिचे प्रेत पंख्याला अडकवून दिले असे पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले.
दरम्यान, तिच्या मित्राचा मृतदेह झाडाला टांगलेल्या अवस्थेत सापडला. शवविच्छेदनात मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचे तर मुलाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीच्या भावांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on May 7, 2014 12:00 pm

Web Title: honour killing girl killed by brothers boy commits suicide in up
Next Stories
1 व्यक्तीची जात नाही, कर्म नीच असतात – राहुलबाबाचे मोदींना उत्तर
2 मोदींनी त्यांच्या मातोश्रींची काळजी मला घेऊ द्यावी- काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र!
3 भाजप नेत्याची प्रियांका गांधींविरोधात न्यायालयात तक्रार
Just Now!
X