News Flash

होस्नी यांच्याकडून राजवटीचे समर्थन

जुलमी राजवटीविरोधात २०११ मध्ये झालेल्या उठावादरम्यान ८५० निदर्शकांना अत्यंत निर्दयी पद्धतीने मारण्याच्या कृत्याबद्दल इजिप्तचा माजी हुकूमशहा होस्नी मुबारक याने न्यायालयाची माफी मागितली नाहीच

| August 14, 2014 12:06 pm

जुलमी राजवटीविरोधात २०११ मध्ये झालेल्या उठावादरम्यान ८५० निदर्शकांना अत्यंत निर्दयी पद्धतीने मारण्याच्या कृत्याबद्दल इजिप्तचा माजी हुकूमशहा होस्नी मुबारक याने न्यायालयाची माफी मागितली नाहीच, उलट आपल्या ३० वर्षांच्या राजवटीचे समर्थन करताना निदर्शकांवर कारवाईचे आदेश आपण दिले नव्हते, असा युक्तिवाद केला.
८५० जणांच्या हत्येला कारण ठरलेल्या होस्नी मुबारक याच्यावर सध्या खटला सुरू असून बुधवारी सुनावणीच्या वेळी ८६ वर्षीय मुबारक याला चाकाच्या खुर्चीवरून न्यायालयात हजर करण्यात आले.
तो म्हणाला की, आधीचा हुकूमशहा अन्वर सादत याची हत्या झाली. त्यानंतर इजिप्तच्या गादीवर आपण आलो. ते पायउतार होईपर्यंत गुन्हे, बदनामी आणि आरोपांचा सामना आपल्याला करावा लागला; परंतु निष्ठा, आदर आणि प्रामाणिकपणाच्या जोरावरच इजिप्तच्या कारभाराचा गाढा हाकला. माझ्या कृत्याला इतिहासच न्याय देईल. २५ मिनिटे चाललेल्या सुनावणीदरम्यान मुबारक याने निदर्शकांना मारण्याचा आदेश दिला नव्हता, असे कैरो गुन्हे न्यायालयासमोर सांगितले.

मी माझ्या आयुष्यात इजिप्तच्या सन्मानासाठी शत्रूंशी लढलो. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी माझ्याच लोकांना मारणार नाही. माझ्या हातून असे पाप कधीच घडले नाही आणि घडणार नाही.
होस्नी मुबारक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2014 12:06 pm

Web Title: hosni mubarak defends his rule
Next Stories
1 गेल्या दहा वर्षांत प्रथमच लोकसभेत पंतप्रधानांचे मतदान
2 माहितीशास्त्रातील ऑलिम्पियाडमध्ये दिल्लीतील विद्यार्थ्यांला सुवर्णपदक
3 अमेरिकेचे आणखी १३० जवान इराकमध्ये
Just Now!
X