26 January 2021

News Flash

रुग्णालयास आग; पाच करोनारुग्णांचा मृत्यू

राजकोटमधील दुर्घटना

(संग्रहित छायाचित्र)

 

गुजरातमधील राजकोट येथे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास आग लागून पाच कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही आग लागली होती. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार २६ इतर रुग्णांवर उपचार चालू होते. त्यांची सुटका करण्यात आली असून दुसरीकडे हलवण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये अहमदाबाद येथील रुग्णालयात आग लागून आठ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता.

आनंद बंगला चौकात उदय शिवानंद रुग्णालयाच्या चार मजली इमारतीत अतिदक्षता विभागात ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत तीव्र  दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये भरपाई देण्यात आली आहे.

राजकोटचे पोलीस आयुक्त मनोज अग्रवाल यांनी सांगितले  की, प्राथमिक माहितीनुसार ही आग  कृत्रिम श्वसनयंत्रातील शॉर्टसर्किटमुळे लागली. या रुग्णालयास अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. तेथे अग्निशमन यंत्रेही होती. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने सांगितले की, या घटनेची चौकशी सनदी अधिकारी ए. के. राकेश करतील. राम सिंह, नितीन बदानी, रसिक अग्रावत, संजय राठोड व केशू अकबरी यांचा मृतांत समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अहवाल मागवला

या दुर्घटनेची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून  गुजरात सरकारकडे अहवाल मागितला आहे. न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील  न्या. आर.एस.रेड्डी, न्या. एम.आर शहा यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे की, असे प्रकार वारंवार घडत असून राज्यांनी  उपाययोजना केलेल्या नाहीत. सरकारी आणि  खासगी रुग्णालयांत सारखीच परिस्थिती आहे. तेथील वीजजोडणी व  अग्निशमन यंत्रणांची तपासणी करण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 12:19 am

Web Title: hospital fire five corona patients die abn 97
Next Stories
1 .. तर व्हाइट हाऊस सोडू -ट्रम्प
2 करोनाच्या धास्तीने किम यांच्याकडून दोघांना मृत्युदंड
3 उच्च न्यायालयाला घटनात्मक कर्तव्याचा विसर
Just Now!
X