News Flash

सिकंदराबादमध्ये हॉटेलची इमारत कोसळली, १२ जणांचा बळी

सिकंदराबादमध्ये हॉटेल म्हणून वापरात असलेली एक इमारत सोमवारी सकाळी कोसळली.

| July 8, 2013 10:49 am

सिकंदराबादमध्ये हॉटेल म्हणून वापरात असलेली एक इमारत सोमवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत १२ जणांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, १६ जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱयाखाली आणखी काही जण दबले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मातीचा ढिगारा हटविण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून, ढिगाऱयाखाली अडकलेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येते आहे. इमारतीखाली सापडून सहा जणांचा बळी गेला असून, आतापर्यंत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती हैदराबादचे पोलिस आयुक्त अनुराग शर्मा यांनी दिली.
सिकंदराबादमधील राष्ट्रपती रस्त्यावर असलेली ही दोन मजली इमारत सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. तिथे सिटी लाईट नावाचे हॉटेल होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 10:49 am

Web Title: hotel building collapses in secunderabad 12 killed
Next Stories
1 बोधगयातील बॉम्बस्फोटप्रकरणी एक जण ताब्यात
2 अमेरिकेत विमान अपघातात २ ठार, १८२ जखमी
3 लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज
Just Now!
X