आजच्या डिजीटल युगामध्ये ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेण्ड वाढला आहे. अनेकजण आज दुकानांमध्ये जाऊन शॉपिंग करण्याऐवजी ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देतात. वेगवेगळे सेल, आकर्षक ऑफर्स आणि घरपोच सेवा या ऑनलाइन शॉपिंगच्या जमेच्या बाजू असल्याने दिवसोंदिवस ऑनलाइन शॉपिंगमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातही खास करुन महिलांमध्ये ऑनलाइन शॉपिंग विशेष लोकप्रिय आहे. याच ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या ट्रेण्डमुळे हरियाणामधील एक गृहिणी महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. आपला छंद जोपासण्याच्या उद्देशाने घेतलेल्या एका निर्णयामुळे आज ही महिला एका ब्रॅण्डची मालकीण आहे. या महिलेचे नाव आहे, रितू कौशिक.

नक्की त्या काय करतात?

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
2024 Bajaj Pulsar NS Series Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, बजाजची पल्सर नव्या अवतारात देशात दाखल, जाणून घ्या किंमत…
girl committed suicide Pavnur
वर्धा : परीक्षेत नापास होण्याची भीती, शेतकरी कन्येने उचलले टोकाचे पाऊल…

देशामध्ये स्त्री-पुरुष गुणोत्तराबद्दल कायमच चर्चेत असणारे राज्य म्हणजे हरियाणा. स्त्रीविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांमुळेही हे राज्य अनेकदा चर्चेत असते. मात्र याच राज्यातील सोनीपत येथे राहणाऱ्या रितू यांनी इतर स्त्रीयांना आदर्श घालून दिला आहे. हॅण्डबँग बनवण्याची आवड असणाऱ्या रितू यांनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून आपल्या या छंदाचे व्यवसायामध्ये रुपांतर केले. रितू यांनी फ्लिपकार्टवर सेलर म्हणून आपले नाव नोंदवले आणि २०१६ साली ‘रितूपाल’ हा ब्रॅण्ड सुरु केला. रितू या स्वत: बनवलेल्या बॅग फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकू लागल्या. “मी माझ्या छंदामधूनच व्यवसाय उभा केला,” असं रितू अभिमानाने सांगतात.

कसा सुरु झाला प्रवास?

वयाच्या १६ व्या वर्षीच रितू यांचे लग्न झालं. त्यामुळेच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. लग्नानंतर त्या बराच काळ गृहिणीच होत्या. मात्र लग्नानंतर त्यांच्या पतीने त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. लग्नानंतर रितू पुन्हा कॉलेजला जाऊ लागल्या आणि त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करण्याबरोबरच त्या घराची आणि मुलांचीही काळजी घेत होत्या. रितू यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:च्या बँगांचा व्यवसाय सुरु केला.

कुठून आली कल्पना?

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करण्याचा निर्णय रितू यांनी घेतला. त्यावेळी आपल्या ओळखीतील अनेकजण ऑनलाइन शॉपिंग करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी ऑनलाइन माध्यमातून व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पतीकडून कंप्युटर वापरण्याचे शिक्षण घेतलं. “मुलं शाळेत गेल्यानंतर मी कंप्युटरवर सराव करायचे. त्यामुळे मला मदतीला कोणीच नसल्याने कंप्युटर शिकताना मला बऱ्याच अडचणी आल्या. तुझा नवरा नोकरी करतो तुला कमवायची काय गरज आहे असं माझे शेजारी आणि नातेवाईक मला सांगायचे. मी एक महिला असल्याने ते अनेकदा मला ऐकवायचे,” असं रितू सांगतात. मात्र ‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ या म्हणीप्रमाणे रितू यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले. अखेर त्यांनी सर्वांना खोटे ठरवत स्वत:चा व्यवसाय सुरु केलाच.

फ्लिपकार्ट दिलेलं कर्ज का नाकारलं?

“फ्लिपकार्टने मला माझा व्यवसाय सुरु करण्यासाठी खूप मदत केली. या मदतीची मला खूप गरज होती. आपल्या वस्तू कशापद्धतीने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत आकर्षक पद्धतीने पोहचवायच्या हे मी फ्लिपकार्टकडून शिकले. यासाठी मी फ्लिपकार्टची कायम आभारी राहील,” असं रितू सांगतात. फ्लिपकार्टने रितू यांना कर्जही देऊ केलं होतं पण त्यांना स्वत:च्या पैशाने व्यवसाय सुरु करायचा असल्याने त्यांनी ते कर्ज नाकारलं. रितू यांनी स्वत:च्या पैशांमधून व्यवसाय सुरु केला आणि तो वाढवला.

महिन्याची कमाई पाहून थक्क व्हाल…

रितू फ्लिपकार्टवरुन ज्या बॅग विकतात त्यांची किंमत २०० रुपये ते दीड हजार रुपयांपर्यंत असते. पहिल्या वर्षात रितू यांनी फ्लिपकार्टवरुन बॅग विकून एक लाख रुपये कमावले. तीन वर्षांत त्यांनी आपल्या व्यवसाय एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवला की तीन वर्षांनंतर त्या आता महिन्याला सात ते आठ लाख रुपये कमावतात. फ्लिपकार्टवरुन एखाद्या महिलेने स्वत: बनवलेल्या वस्तू विकून केलेली ही सर्वाधिक कमाई आहे. आता महिन्याला २० लाखांपर्यंत कमाई करण्याचे लक्ष्य त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे.