विमानाचे इंधन संपल्यामुळे आम्ही अतिशय वाईट पद्धतीने फसलो आहोत. एअर इंडियाच्या वरिष्ठ कमांडंटने एअर ट्रॅफीक कंट्रोलला (एटीसी) हे सांगितल्यावर सगळ्यांचेच धाबे दणाणले होते. रुस्तम पालिया यांनी एटीसीला याबाबतची माहिती दिली. न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावर याबाबतची माहिती दिली आहे. पालिया आणि कॅप्टन सुशांत सिंह हे दोघेही दिल्लीहून JFK AI 101 नॉनस्टॉप बोईंग ७७७ विमान चालवत होते. या विमानात एकूण ३७० प्रवासी होते आणि विमानातील काही उपकरणांनी काम करणे बंद केले होते. तांत्रिक खराबीमुळे विमान साधारण दीड तास हवेत फीरत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दरम्यान दोन्ही वैमानिकांनी आपले साहस आणि कंट्रोलर याच्या जीवावर ही परिस्थिती सांभाळली. विमान आपातकालिन स्थितीत लँड करायचे असल्यास वापरात येणारे तंत्रज्ञानही बंद पडले होते. त्यामुळे विमानाचे लँडींग करणे अशक्य होते. त्यामुळे हे विमान दीड तास हवेत फीरत राहीले. दरम्यान विमान विमानतळावर उतरवता येईल का याविषयी बोलणी सुरु होती. नेमके कोणत्या विमानतळावर उतरवायचे याबाबतचा निर्णय होत होता. बराच काळ विमान फिरत असल्याने त्यातील इंधनही संपत आले होते. या कालावधीत पायलट आणि कंट्रोलर यांच्यात बरीच चर्चा सुरु होती. खराब परिस्थितीतही विमान योग्य पद्धतीने लँड करता येईल यासाठी दिलासा दिला जात होता.

ठरल्यानुसार आधीच्या एका विमानानंतर या विमानाचे लँडींग होणार होते. एक चक्कर मारुन विमान खाली उतरणार तितक्यात विमानाच्या इतर उपकरणांमध्येही बिघाड झाल्याचे लक्षात आले. मग त्यांनी लगेचच कंट्रोल रुमला याबाबत माहिती दिली. मात्र तरीही योग्य ती जागा मिळत नसल्याने बराच वेळ दोघांतील संभाषण सुरु होते. मात्र दोन्ही पायलटनी अतिशय योग्य पद्धतीने निर्णय घेऊन आणि साहस दाखवून निर्णय घेतल्याने इतक्या प्रवाशांचे प्राण वाचण्यास मदत झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How air india pilots saved 370 travellers life
First published on: 18-09-2018 at 19:28 IST