१९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर तिबेटी जवानांसाठी खास स्पेशल फ्रंटियर फोर्स हे युनिट बनवण्यात आलं. पण त्या आधीपासून हे तिबेटीयन योद्धे गनिमी काव्याच्या युद्धकौशल्यात पारंगत होते. चीनच्या जुलमी, अत्याचारी राजवटीविरोधात या यौद्ध्यांनी लढा दिला. त्यासाठी या तरुणांना कोणी प्रशिक्षित केलं?, त्यांच्या सशस्त्र गटाचे काय नाव होतं? ते आपण समजून घेऊया.

विस्तारवादी मानसिकता ठेवणाऱ्या चीनने १९५० साली तिबेटवर आक्रमण करुन तिबेटचा भूभाग बळकावला. आजही सर्वसामान्य तिबेटी जनतेच्या मनात चीनबद्दल प्रचंड राग आणि संतापाची भावना आहे. जगाच्या वेगवेगळया भागात तिबेटी नागरिक चीनच्या या दडपशाही विरोधात शक्य त्या मार्गाने आवाज उठवत असतात.