आपल्या बाजूचं राज्य असलेल्या केरळमध्ये करोना बाधितांची संख्या ही कमी झालेली आहे किंवा आहे तिथेच थांबलेली आहे असं चित्र दिसून येतं. महाराष्ट्राच्या तुलनेत केरळमध्ये करोना बधितांची संख्या वाढताना दिसत नाही. केरळने हे कसं जमवून दाखवलं? काय होती केरळची पद्धत?. कुठली ठोस पावलं केरळ राज्याने उचलली?. काय होता केरळचा पॅटर्न?
भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोना बधित रुग्णांची संख्या ही जवळपास सारखीच होती.
पण आता महाराष्ट्रातील आकडा पाहता त्यात झपाट्याने वाढ होत असल्याचं लक्षात येतं. महाराष्ट्रातील करोना बधित रुग्णांची संख्या आता तीन हजारांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. पण दुसरीकडे केरळची स्थिती पाहता, केरळ अतिशय सुस्थितीत असल्याचं लक्षात येतं, कारण या केरळ राज्याने आतापर्यंत कोरोना बधित रुग्णांची संख्या ४०० च्या पुढे जाऊ दिलेली नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 12:25 pm