गुजरात दंगलीनंतर सातत्याने नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारणारी अमेरिका आता त्यांचे लाल गालिचा अंथरून स्वागत करण्यास सज्ज झालेली असतानाच तेथील उद्योगजगताने मात्र मोदींच्या एकूणच कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने आर्थिक सुधारणांना गती देण्याचे संकेत दिले असले तरी त्यांच्या कृतीतून मात्र तसे दिसत नसल्याची तक्रार अमेरिकी उद्योजकांनी अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे मांडली आहे. बाली येथे झालेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या करारमदाराला काडीचीही किंमत न देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची किनार या तक्रारीला आहे.
मोदी यांचे पाच दिवसांच्या अमेरिकी दौऱ्यासाठी येथे शुक्रवारी आगमन झाले असतानाच अमेरिकी चेंबर ऑफ कॉमर्स आणि विविध उद्योगक्षेत्रातील १५ धुरिणांनी ओबामा यांना खुले पत्र लिहिले आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या कराराला केराची टोपली दाखवण्याच्या मोदींच्या कृतीबद्दल त्यांच्याकडे विचारणा करावी अशी आग्रही मागणी करण्याबरोबरच या उद्योजकांनी मोदी सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांबाबत आतापर्यंत काय केले तसेच खुल्या व्यापारी धोरणाबाबत त्यांची नेमकी काय भूमिका आहे, याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जावेत असे उद्योजकांनी पत्रात म्हटले आहे. मोदी अमेरिका भेटीदरम्यान गुगल, आयबीएम, जीई, गोल्डमन सॅश व बोइंग या  कंपन्यांच्या प्रमुखांसह १७ उद्योजकांच्या भेटी घेणार असून त्यांना भारतातील गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात आग्रह करणार आहेत.

संरक्षण, विमा आणि रेल्वे आदी क्षेत्रांतील गुंतवणुकीसंदर्भातील र्निबध शिथिल करून मोदी यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यांच्या कृतीमधून निराळेच संकेत मिळत आहेत. याबाबत स्पष्ट धोरण हवे.
– स्टिफन इझेल, व्यापार धोरण क्षेत्रातील अमेरिकी तज्ज्ञ

‘अमेरिका हा भारताचा नैसर्गिक सहभागीदार’
अमेरिका हा भारताचा नैसर्गिक सहभागीदार असून उभय देशांमधील बळकट लोकशाही जगभरातील लोकांच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये लिहिलेल्या लेखात मोदी यांनी हे मत मांडले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक सामायिक हितांच्या गोष्टी असून त्या परस्परांच्या विकासासाठी पूरक ठरू शकतात, असेही मोदी यांनी या लेखात म्हटले आहे.

how much bilive to modi us business tycoons
Narendra Modi, Barack Obama, loksatta news, loksatta, marathi news, marathi    
मोदींवर कितपत विश्वास ठेवायचा?
अमेरिकी उद्योजकांचा सवाल
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन