07 July 2020

News Flash

स्पॅनिश फ्लूनंतर अर्थव्यवस्था कशी सावरली याचा अभ्यास करावा

केंद्र सरकारची विद्यापीठांना सूचना

(संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारची विद्यापीठांना सूचना

नवी दिल्ली : भारताने १९१८ मधील स्पॅनिश फ्लूची साथ कशी हाताळली होती व त्यावेळी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी काय उपाय करण्यात आले होते याचे संशोधन विद्यापीठांनी करावे, असे आवाहन मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या शिफारशीत म्हटले आहे की, विद्यापीठांनी कोविड १९ बाबत ग्रामीण भागात किती जागरूकता आहे याचीही तपासणी संशोधनाच्या माध्यमातून करावी. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, १९१८ मध्ये जी साथ आली होती ती स्पॅनिश फ्लूची होती त्यावेळी नेमके कोणते उपाय करण्यात आले होते व त्यावेळी अर्थव्यवस्था कशी सावरण्यात आली याचे संशोधन करण्यात यावे अशी अपेक्षा मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, करोना विषाणूशी लढण्यात शैक्षणिक संस्थांनी संशोधनाच्या माध्यमातून मदत करावी. त्यात सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात करोनाबाबत किती जागरूकता आहे, यावरही संशोधन करून शोधनिबंध सादर करावेत. विद्यापीठे व इतर संस्थांनी आजूबाजूची ५-६ खेडी निवडून हा अभ्यास करावा. कोविड १९ मुळे निर्माण झालेली आव्हाने लोकांनी कशाप्रकारे पेलली यावरही संशोधनातून प्रकाश पडला तर त्याचा फायदा नियोजनात होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2020 3:35 am

Web Title: hrd ministry instructions universities to study how economy recovered after the spanish flu zws 70
Next Stories
1 lockdown : आदेश आणि खुलाशांची मालिका
2 IITs, IIITs कडून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात फी वाढ नाही; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण
3 Coronavirus : देशात एका दिवसात ४७ जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या २७ हजारांजवळ
Just Now!
X