बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता हृतिक रोशन याचे आजोबा जे. ओम प्रकाश यांचे बुधवारी (७ ऑगस्ट ) निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. जे. ओम प्रकाश यांनी ‘आप की कसम’ (१९७४) या चित्रपटातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘फिल्म युग’ या बॅनरअंतर्गंत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीदेखील केली.

जे. ओम प्रकाश यांचं निधन झाल्यानंतर हृतिक रोशनने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यासोबतच एक भावनिक पोस्टही शेअर केली. आजोबांचं त्याच्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान होतं हे त्याने यावेळी सांगितलं.

 ‘आस का पंछी’, ‘आई मिलन की बेला’, ‘आया सावन झुम के’, ‘ऑखो ऑखो मे’, ‘आन मिलो सजना’ हे त्याचे चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजले. तर ‘अफसाना दिलवालों का’, ‘आदमी खिलौना है’, ‘आदमी और अफसाना’, ‘भगवान दादा’, ‘अपर्ण’, ‘आस पास’, ‘आशा’ या चित्रपटाचं यशस्वी दिग्दर्शन केलं. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर कलाविश्वात शोक व्यक्त करण्यात येत आहे. जे. ओम प्रकाश हे अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांचे वडील होते.