05 April 2020

News Flash

Shocking News : 35 हजार बँक कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार

35 हजार बँक कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार...

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या एचएसबीसी (HSBC) बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर लवकरच गंडांतर येणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये 35 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

वार्षिक नफ्यात 33% घट झाल्याचे उघडकीस आल्यानंतर येत्या तीन वर्षांमध्ये 35,000 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. याशिवाय, आशिया खंडामध्ये फैलाव झालेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे 2020 च्या नफ्यात अजून घट होवू शकते, असा इशाराही कंपनीने दिला आहे.

आणखी वाचा – (स्वस्तात घर-दुकान! SBI कडून कर्जबुडव्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी)

बँकेचा वार्षिक नफा 33 ट्क्क्यांहून घसरून 13.3 अब्ज डॉलरवर आल्याची माहिती बँकेने मंगळवारी दिली. तसेच, एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी नोएल क्विन यांनी नोकरीत कपात करण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. Reuters या वृत्तसंस्थेशी बोलताना नोएल क्विन यांनी सांगितले की, “जगभरातील एचएसबीसीच्या शाखांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीचा फटका बसेल. जगभरात कार्यरत असलेल्या आमच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार आहे. सध्या एचएसबीसी बँकेत दोन लाख पस्तीस हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कपातीनंतर आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या दोन लाखांवर येईल”, असेही क्विन यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 1:35 pm

Web Title: hsbc to cut 35000 jobs worldwide after profits plunge sas 89
टॅग Hsbc
Next Stories
1 धक्कादायक! पती, सासरच्या छळाला कंटाळून गायिकेची आत्महत्या
2 मिसाइल हल्ल्याच्या भितीने पाकिस्तानने मसूद अझहरला बॉम्बप्रूफ घरामध्ये लपवलं
3 पुलावामा सारख्या हल्ल्याचा कट उघड, डॉक्टरच्या फोन टॅपिंगमधून खुलासा
Just Now!
X