News Flash

संतापजनक! पोलिसांनी कचरागाडीतून नेला पत्रकाराचा मृतदेह

पोलिसांनी रूग्णवाहिका बोलावण्याऐवजी कचरा घेऊन जाणारी गाडी बोलावली

रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या एका पत्रकाराचा मृतदेह रूग्णवाहिकेत न नेता पोलिसांनी कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीतून रूग्णालयात नेल्यामुळे कर्नाटक पोलीस दलावर टीका होताना दिसत आहे. (छायाचित्र: एएनआय)

पोलिसांच्या एका असंवेदनशील कृतीमुळे कर्नाटकात असंतोष व्यक्त केला जात आहे. रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या एका पत्रकाराचा मृतदेह रूग्णवाहिकेत न नेता पोलिसांनी कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीतून रूग्णालयात नेल्यामुळे कर्नाटक पोलीस दलावर टीका होताना दिसत आहे. आपल्या या कृत्याचा खेद व्यक्त करण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र समर्थन केल्याचे दिसून येते. वाहन उपलब्ध नसल्यामुळे कचरा गाडीचा उपयोग केल्याचे पोलीस सांगत आहेत. एका वृत्त वाहिनीत कार्यरत असलेले मौनेश यांचा रविवारी (दि.१४ जानेवारी) रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. सिरसी येथून हावेरी येथील आपल्या कार्यालयाला जाताना नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची दुचाकी थेट झाडावर जाऊन आदळली. मौनेश यांचा जागीच मृत्यू झाल्याचा दावा पोलीस करत आहेत. स्थानिक पोलिसांनी रूग्णवाहिका बोलावण्याऐवजी कचरा घेऊन जाणारी गाडी बोलावली व त्यातून मौनेश यांचा मृतदेह सरकारी रूग्णालयात नेला. नगरपालिकेकडून कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. त्यातूनच मृतदेह नेण्यात आला.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, हावेरीचे पोलीस अधीक्षक के. प्रकाशम यांनी पोलिसांचा बचाव केला आहे. मृतदेह नेण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. जोपर्यंत शवविच्छेदन होत नाही. तोपर्यंत रूग्णवाहिकेतून मृतदेह नेला जात नाही. अशावेळी पोलिसांनाच वाहनाची सोय करावी लागते. संक्रांती असल्यामुळे दुसऱ्या गाडीची सोय होऊ शकली नाही. मग पोलिसांनी नगर पालिकेशी संवाद साधला. त्यावेळी हे वाहन मिळाले, असे प्रकाशम यांनी सांगितले. पण पोलीस यासाठी त्यांची जीपचा वापर करू शकले, असते अशी चर्चा सध्या रंगली आहे.

दरम्यान, मौनेश यांचा मोठा भाऊ महादेव यांनी पोलिसांवर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी माझ्या भावाचा मृतदेह कचऱ्याच्या ट्रॅक्टरमधून आणला. इतकंच नव्हे तर ७०० रूपये लाच न दिल्यामुळे त्यांनी भावाचे शवविच्छेदनही लवकर केले नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. भावाच्या निधनामुळे आम्हाला धक्का बसला असताना, पोलिसांच्या अशा असंवेदनशील कृत्यामुळे आमच्या दु:खात भर पडल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 2:11 pm

Web Title: hubli police carried body of a journalist in a garbage truck due to unavailability of vehicles
Next Stories
1 सुप्रीम कोर्टातील वाद अजून मिटलेला नाही: अॅटर्नी जनरल
2 खूशखबर !, देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा मिळण्याची शक्यता
3 सज्ञान मुला-मुलींच्या आंतरजातीय विवाहावर खाप पंचायतीचे निर्बंध नकोत: सुप्रीम कोर्ट
Just Now!
X