News Flash

जम्मू-काश्मीरमधील खेडय़ात प्रौढांचे शंभर टक्के लसीकरण!

गावातील प्रौढांचे लसीकरण करणे हे अवघड काम होते कारण तेथील बहुतेक लोक भटक्या समाजातील आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

लक्ष्य गाठणारे भारतातील पहिले गाव

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागातील वेयान या छोटय़ा गावात सर्व प्रौढांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरण पूर्ण करणारे ते देशातील पहिलेच गाव ठरले आहे. याचे श्रेय तेथील आरोग्य सेवकांना आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच लसीकरण शक्य झाले आहे. या गावाची लोकसंख्या ३६२ असून त्यातील सर्व प्रौढांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की हे गाव बांदीपोरा या जिल्ह्य़ाच्या मुख्य ठिकाणापासून २८ कि.मी. अंतरावर असून तेथे जाताना १८ कि.मी. अंतर पायीच जावे लागते कारण तेथे जाण्यासाठी मोटार जाईल असा रस्ताच नाही. अधिकाऱ्यांच्या मते या गावातील प्रौढांचे लसीकरण करणे हे अवघड काम होते कारण तेथील बहुतेक लोक भटक्या समाजातील आहेत. ते गुरांना चरण्यासाठी उंचावरच्या ठिकाणी घेऊन जातात. या गावात रस्त्यांचे जाळे नाही. त्यामुळे लोकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याकरिता जाता येत नाही. असे बांदीपोराचे मुख्य वैद्यकीय अधिकारी बशीर अहमद खान यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर प्रारूपाअंतर्गत हे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून संपूर्ण लोकांच्या लसीकरणासाठी दहा कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लसीकरणाबाबत लोक फारसे उत्सुक नव्हते पण राज्याने ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण ७० टक्के या प्रमाणात पूर्ण केले आहे. गावाच्या पूर्ण लसीकरणाबाबत जम्मू-काश्मीर सरकारचे माध्यम सल्लागार यतीश यादव यांनी सांगितले, की कोविड लसीकरणात जम्मू-काश्मीरमधील या खेडय़ाने एक मापदंड घालून दिला आहे.  जम्मू-काश्मीर प्रारूपामुळेच हे शक्य झाले. आम्ही एव्हरेस्ट गाठले आहे पण अजून प्रवास बाकी आहे. जम्मू-काश्मीरच्याच नव्हे तर देशाच्या इतर गावांसाठी हा आदर्श आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 3:11 am

Web Title: hundred percent adult vaccination in rural jammu and kashmir zws 70
Next Stories
1 उत्तर प्रदेश, बिहारमध्ये टाळेबंदी शिथिल
2 विद्यार्थिनीचे सर्वोच्च न्यायालयाला आभाराचे पत्र!
3 रुग्णांचा प्राणवायुपुरवठा खंडित करून ‘आपत्कालीन सराव’
Just Now!
X