आफ्रिकेमधील बोत्सवाना देशात मागील काही दिवसांमध्ये ३५० हत्तीचे मृतदेह सापडले आहेत. जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडलेल्या या हत्तींच्या मृतदेहांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यापैकी बहुतांश हत्ती हे पाण्याच्या साठ्याजवळ मृतावस्थेत आढळून आले आहेत. पाण्यामधून या हत्तींवर विषप्रयोग तर करण्यात आला नाही ना अशीही शंका उपस्थित केली जात आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्तींचा मृत्यू का झाला आहे, हा एखादा रोग आहे का यासंदर्भातील तपास आता संशोधक करत आहे. याबद्दलचे वृत्त द गार्डियनने दिलं आहे.

बोत्सवाना सरकारने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र हस्तीदंतांसाठी अशाप्रकारे विष प्रयोग करुन हत्तींना मारल्याच्या अनेक घटना झिम्बाब्वेमध्ये याआधी घडल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी हत्तींचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे याआधी कधी पाहण्यात आलेलं नाही असं डायरेक्टर ऑफ कंझर्वेशन अट नॅशनल पार्क रेस्क्यू टीममधील डॉक्टर नील मॅकेन यांनी गार्डीयनशी बोलताना सांगितलं आहे. दुष्काळ असेल तेव्हाच अशाप्रकारे हत्तींचा मृत्यू होतो. मे महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ओकावांगो डेल्टा या भागामध्ये ३५० हून अधिक हत्तींचा मृत्यू झाल्याचा दावा मॅकेन यांनी केला आहे.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर

सरकारने कोणताही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी या प्रकरणाचा तपास सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सुरु करण्यात आला आहे. सरकारने मृत हत्तींच्या शरीरातील काही पदार्थांची चाचणी केली आहे मात्र यासंदर्भातील चाचणीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. आफ्रीकेमधील एक तृतीयांश हत्तींची संख्या ही बोत्सवानामध्ये आहे. एका हवाई सर्वेक्षणामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना १६९ हत्तींचे मृतदेह आढळून आलं आहेत. मॅकने यांनी वेगवेगळ्या भागांमधील गटांना ३५० हत्तींहून अधिक मृत हत्ती आढळून आल्याचे सांगितलं आहे. विशेष म्हणजे केवळ हत्तींचे मृतदेह या गटांना दिसून आले आहेत. इतर कोणतेही मृत प्राणी या पहाणी दरम्यान सापडलेले नाही.

फोटो: द गार्डियनवरुन साभार

मॅकेन यांच्या सांगण्यानुसार हे बेकायदेशीर शिकारीचे प्रकरण असते तर इतरही प्राणी मृत आढळले असते. मात्र असं सध्या तरी दिसत नाहीय. जर पाण्यात विष टाकण्यात आलं असतं तर इतर प्राणीही मेले असते. त्यामुळे हा एखादा रोग असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मॅकेन म्हणतात. मेलेले अनेक हत्तींच्या तोंडाजवळचे केस गळून पडल्याचे निरदर्शनास आलं आहे. हे विषप्रयोगाचे लक्षण आहे. मात्र यासंदर्भातील अहवाल अद्याप समोर आलेला नाही. जो पर्यंत हे अहवाल समोर येत नाही तोपर्यंत ठोसपणे काहीच सांगता येणार नाही असंही मॅकेन म्हणतात.

मानवामधून एखाद्या आजाराचा हत्तींना संसर्ग झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. बोत्सवानामधील वन्यजीव आणि राष्ट्रीय उद्यान विभागाचे कार्यवाहक निर्देशक डॉ. साइरिल टोलो यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कमीत कमी २८० हत्तींचा मृत्यू झाला आहे.