आत्ताच्या स्थितीत लोकसभा निवडणुका झाल्यास, देशात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे असे एबीपी सी व्होटर्सचा सर्व्हे सांगतो आहे. एनडीएला 233 जागा मिळतील. काँग्रेसला 167 जागा मिळतील असे मत या जनमत चाचणीत नोंदवण्यात आले आहे. अन्य जागा 143 इतर पक्षांना मिळतील. त्यामुळे लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, स्पष्ट बहुमत कोणालाही मिळणार नाही असे हा सर्व्हे सांगतो.
लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात जाहीर होणार आहे. ही लढाई नमो विरुद्ध रागा अशीच आहे. म्हणजेच भाजपा विरुद्ध काँग्रेस असाच हा सामना असणार आहे. या जनमत चाचणीसाठी 10 हजार पेक्षा जास्त लोकांना मत विचारण्यात आले. त्यानंतर हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा त्रिशंकू होईल असा अंदाज या चाचणीत वर्तवण्यात आला आहे.
आता जनता कोणाला कौल देणार? मतपेटीतून मोदींना निवडून देणार की राहुल गांधींना हे स्पष्ट होणारच आहेत. मात्र निवडणुकांच्या अनुषंगाने जे सर्व्हे समोर येत आहेत त्यानुसार, त्रिशंकू लोकसभेचा सामना देशाला करावा लागेल असं दिसतं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 24, 2019 9:27 pm