News Flash

‘हुरियत’चे भारत-पाकिस्तानला काश्मीरबाबत चर्चेसाठी आवाहन

नियंत्रण रेषेनजिक राहणाऱ्या लोकांचा ‘निर्थक रक्तपात’ थांबवावा

(संग्रहित छायाचित्र)

 

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारत व पाकिस्तान यांनी बोलणी करावी आणि नियंत्रण रेषेनजिक राहणाऱ्या लोकांचा ‘निर्थक रक्तपात’ थांबवावा, असे आवाहन मवाळपंथी हुरियत कॉन्फरन्सने शनिवारी केले.

नियंत्रण रेषेवर भारत व पाकिस्तान या दोन्ही बाजूंकडून शुक्रवारी जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा होऊन त्यात अनेक जीव गेल्याच्या घटनेबाबत मिरवाईझ उमर फारुक यांच्या नेतृत्वाखालील हुरियतने एका निवेदनाद्वारे दु:ख व्यक्त केले.

‘भारत व पाकिस्तान यांच्या सरकारांनी भांडखोरपणा सोडून देऊन येत्या काळात काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेच्या मेजावर यावे आणि दोन्ही बाजूंच्या लोकांचा निर्थक रक्तपात थांबावावा’, असे निवेदनात म्हटले आहे. रेंगाळणाऱ्या संघर्षांत सापडलेल्या नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंकडील निष्पाप काश्मिरी नागरिकांचे, तसेच दोन्ही देशांच्या सैनिकांचे मृत्यू अतिशय दु:खद व लज्जास्पद असल्याचेही यात नमूद करण्यात आलेआहे.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील खेडी आणि सीमा चौक्या यांना लक्ष्य करून शुक्रवारी केलेला जोरदार गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा यात भारताचे  ५ जवान आणि ६ नागरिक मरण पावले होते. भारतीय फौजांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ८ सैनिक ठार, तर १२ जण जखमी होऊन पाकी लष्कराचे तंबू व बंकर्स आणि दहशतवाद्यांचे तळ यांचे जबरदस्त नुकसान झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:16 am

Web Title: hurriyat calls on india pakistan to discuss kashmir abn 97
Next Stories
1 बायडेन यांच्यापुढे टाळेबंदीच्या निर्णयाचा पेच
2 ट्रम्प यांच्या कायदेविषयक सल्लागारांची निवडणूक गैरप्रकारांच्या खटल्यांतून माघार
3 कोविड साथीला भारताचा एकात्मिक प्रतिसाद -हर्षवर्धन
Just Now!
X