16 January 2019

News Flash

हुंडा न दिल्याने पत्नीला दोरीने बांधून क्रूर मारहाण, शूट करुन सासरच्यांना पाठवला व्हिडीओ

हुंडा न दिल्याने पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर मारहाण करण्यात आल्यानंतर अत्यंत क्रूरतेने पत्नीचे हात दोरीने बांधून लटकवण्यात

हुंडा न दिल्याने पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर मारहाण करण्यात आल्यानंतर अत्यंत क्रूरतेने पत्नीचे हात दोरीने बांधून लटकवण्यात आलं होतं. पतीचा क्रूरपणा एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीवर अत्याचार करत असताना व्हिडीओ शूट करुन तिच्या आई-वडिलांना पाठवून दिला. व्हिडीओ पाठवल्यानंतर आपल्याला ५० हजार रुपये दिले नाही तर रोज अशा प्रकारे अत्याचार करण्यात येईल अशी धमकीही दिली.

ही घटना उत्तर प्रदेशातील शहाजहाँपूरमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी पीडित महिला रुचीचं लग्न लखीमपूर येथील अशोकसोबत झालं होतं. लग्न झाल्यानंतर दुस-या दिवसापासूनच सासरच्यांनी हुंड्यासाठी तिला त्रास देण्यास सुरुवात केली असा आरोप महिलेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. एका वर्षापूर्वी रुचीने एका बाळाला जन्म दिला. यावेळी पतीनेच सगळा खर्च केला होता. यानंतर अशोक वारंवार आपल्या माहेरी जाऊन ५० हजार मागण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत होता. पण तिने नकार दिल्यानंतर काठीने आणि पट्ट्याने जबरदस्त मारहाण केली. यावेळी तिचे हात-पाय बांधून लटकवून ठेवलं होतं.

व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेच्या माहेरच्या लोकांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ मुलीचं सासर गाठलं. तिथे आपली मुलगी बेशुद्द अवस्थेत पडली होती आणि तिचा पती आणि इतर मंडळी फरार झाले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे. बेशुद्ध अवस्थेत रुचीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचीला काठी आणि नंतर पट्ट्याने जबरदस्त मारहाण झालीये. सध्या तिची प्रकृती व्यवस्थित असल्याचं समजत आहे.

First Published on April 16, 2018 6:26 pm

Web Title: husband beats wife over demanding dowry