News Flash

व्हॉट्सअ‍ॅपवरुन कॉलगर्लला बोलावले आणि आली पत्नी

ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी कॉलगर्ल आली तेव्हा ती आपली पत्नीच असल्याचे या व्यक्तीला समजले अन्...

व्हॉट्सअ‍ॅप कॉल

उत्तराखंडमधील काशीपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर फोन करुन बोलवलेली कॉलगर्ल ही त्याची पत्नीच निघाली. आपली पत्नीच कॉलगर्ल म्हणून आल्याचे पाहून या दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. अखेर हे प्रकरण पोलीस स्थानकात गेले. पती पत्नीने एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दांपत्याचे वर्षभरापूर्वीच लग्न झालं आहे. मात्र लग्नानंतर या दोघांमध्ये अनेकदा लहान लहान कारणांवरुन भांडणे होऊ लागले. सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीने माहेरी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. ही महिला काशीपूरमधील आयटीआय परिसरातील आपल्या आई-वडीलांच्या घरीच राहत होती. अगदी कधीतरी ती सासरी जाऊन परत येत असे. या महिलेचे आणि तिच्या मैत्रिणीचे एका छोट्या कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर या भांडणाचा सूड उगवण्यासाठी या महिलेच्या मैत्रिणीने तिच्या पतीला “तुझी बायको कॉलगर्ल म्हणून काम करते,” असं सांगितलं. संबंधित महिलेने तक्रार करण्याबरोबरच एका महिलेचा क्रमांक या व्यक्तीला दिला. “ही माहिला कॉलगर्ल पुरवते. तुम्हीच फोन करुन खात्री करुन घ्या,” असंही या महिलेने सांगितले.

पत्नीच्या मैत्रिणीने दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन या व्यक्तीने कॉलगर्लसंदर्भात चौकशी केली. फोन ठेवल्यानंतर त्याला व्हॉट्सअ‍ॅपवर काही महिलांचे फोटो पाठवण्यात आले. यापैकी हवी ती निवडा आणि पत्ता पाठवा असं या व्यक्तीला सांगण्यात आलं. त्यानुसार या व्यक्तीने आपल्या पत्नीचाच फोटो निवडला आणि कुठे भेटायचं यासंदर्भातील पत्ताही दिला.

ठरल्याप्रमाणे ठरलेल्या ठिकाणी कॉलगर्ल म्हणजेच या व्यक्तीची पत्नी पोहचली तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. मिळेल त्या गोष्टीने दोघे एकमेकांना मारत होते. अखेर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. दोघांनाही एकमेकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. आपली पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करते असं पतीने तक्रारीत म्हटलं आहे. तर दुसरीकडे पत्नीने आपल्या पतीचे मैत्रिणीबरोबर संबंध असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली आहे. आता या प्रकरणात पोलीस चौकशी करत आहेत. मात्र हे प्रकरण स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 4:25 pm

Web Title: husband books call girl by whatsapp call got surprised to see his wife scsg 91
Next Stories
1 तान्हाजीच्या वादात तैमूरचं नाव; सैफ अली खानला भाजपानं दिलं उत्तर
2 धक्कादायक! वर्षभरात सुमारे ८००० व्यावसायिकांनी संपवले स्वतःचे जीवन
3 जिगोलो बनण्याच्या नादात शिक्षकच महिलेच्या जाळयात फसला
Just Now!
X