24 January 2021

News Flash

पार्टीतला एकटीचाच फोटो फेसबुकवर शेअर केल्याने पतीची पोलीस ठाण्यात तक्रार

पत्नीने फेसबुवर फोटो टाकताना पार्टीतला फक्त एकटीचाच फोटो अपलोड केला होता

संग्रहित छायाचित्र

स्मार्टफोन वापरामुळे अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत. घरबसल्या तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकता किंवा जगातील कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधू शकता. मात्र स्मार्टफोनमुळे अचडणीही तेवढ्याच वाढल्या आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक नात्यांमध्ये कडवटपणा आला असून ही प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहेत. एका रिपोर्टनुसार, दिवसाला किमान ६० टक्के अशी प्रकरणं समोर येतात ज्यामध्ये मोबाइलमुळे दांपत्यांमध्ये भांडण झालेलं असतं.

असंच एक प्रकरण समोर आलं ज्यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पतीचं म्हणणं आहे की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात वाढदिवसाची पार्टी होती. यावेळी त्याने आपल्या पत्नीसोबत अनेक फोटो काढले होते. पत्नीने काही वेळाने फेसबुकवर पार्टीतले फोटो अपलोड केले. मात्र फोटो टाकताना तिने फक्त एकटीचेच फोटो अपलोड केले. यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झालं.

पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, काही दिवसांपूर्वी एक दांपत्य मोबाइल पासवर्डवरुन भांडत होतं. कुटुंबिय दोघांच्या भांडणात पडल्याने वाद अजून वाढला होता. सध्या दोघांचं समुपदेशन केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 12:15 pm

Web Title: husband complaint against wife for sharing single photo
Next Stories
1 कॅलिफोर्निया : हल्लेखोराने पत्नीसह 5 जणांना केलं ठार, स्वतःलाही संपवलं
2 २०० रुपये उधार घेऊन खरेदी केलेल्या तिकीटावर लागली दीड कोटींची लॉटरी
3 …म्हणून मी सीरियल किलर झालो, ३३ ट्रकचालकांची हत्या करणाऱ्या नराधमाचा खुलासा
Just Now!
X