X
X

ह्रतिक रोशन आवडतो म्हणून ‘तिची’ पतीनेच केली हत्या

पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केली

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनची चाहती असल्याने महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली असून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केली.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या दिनेश्वर बुध्दीदत्तने (वय ३३ वर्षे) शुक्रवारी रात्री पत्नी Donne Dojoy ची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर दिनेश्वर हावर्ड बीच जवळील एका मैदानात गेला आणि तेथील झाडाच्या आधारे त्याने गळफास घेत आत्महत्या केली. दिनेश्वर आणि Donne चे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. आत्महत्या करण्यापूर्वी खुद्द दिनेश्वरने Donne च्या बहिणीला मेसेज करुन पत्नीची हत्या केल्याचे कळवले होते. त्याच बरोबर त्याने घराच्या शेजारी असलेल्या कुंडी खाली घराची चावी ठेवल्याचे देखील सांगितले.

या घटनेपूर्वी, दोन दिवसांपूर्वी दिनेश्वरला पत्नीवर हल्ला केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. Donne ने स्वत:च्या सुरक्षिततेसाठी न्यायालयाकडे संरक्षणाची मागणी देखील केली होती. या प्रकरणी चौकशी करताना Donne च्या मित्रांनी दिनेश्वरने Donneचे बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनवर क्रश असल्यामुळे हिंसक हल्ला केला असल्याचे सांगितले. सध्या पोलिस पती-पत्नीच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत.

Donne एक बारटेंडर म्हणून काम करत होती. तिची सहकारी माला रामधानीने न्यूयॉर्क पोस्टला Donne चे अभिनेता हृतिक रोशन क्रश असल्याचे आणि तिच्या पतीच्या हिंसक वागण्याबद्दल माहिती होती. तसेच Donne च्या पतीला हृतिक रोशनचा प्रचंड राग येत असे आणि Donne हृतिकचा चित्रपट पाहत असताना तो चित्रपट बंद करण्यास तिचा पती सांगत असल्याची माहिती दिली.

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार २१ ऑगस्ट रोजी दिनेश्वरने पत्नीवर हल्ला केला होता. तेव्हा पासून कोर्टाने Donneला संरक्षण दिले होते. या प्रकरणी दिनेश्वरला जानेवारीमध्ये शिक्षा सुनावण्यात येणार होती. पतीच्या त्रासाला कंटाळून Donne ने घर सोडले होते. हत्या झाली त्या दिवशी Donne चा मित्र रोडनी दिनेश्वरला भेटण्याल गेला होता. दोघांनी चित्रपट पाहिला आणि काही वेळ आराम केला. Donne ने पतीला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी तिची बहिण Fannita Barakat ची इच्छा होती.

21
First Published on: November 12, 2019 4:09 pm
Just Now!
X