News Flash

इंडियन मुजाहिदीनच्या दोन आरोपींचा एनआयएकडे ताबा

१६ जणांचा बळी घेणाऱ्या हैदराबाद बॉम्बस्फोटातील आरोपी इंडियन मुजाहिदीनच्या दोन सदस्यांचा ताबा दिल्ली न्यायालयाने शनिवारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिला आहे. चौकशी करण्यासाठी दिल्ली न्यायालयाने

| March 17, 2013 12:06 pm

१६ जणांचा बळी घेणाऱ्या हैदराबाद बॉम्बस्फोटातील आरोपी इंडियन मुजाहिदीनच्या दोन सदस्यांचा ताबा दिल्ली न्यायालयाने शनिवारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिला आहे. चौकशी करण्यासाठी दिल्ली न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांसाठी एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी आरोपी सईद मकबूल आणि इमरान खान यांचा ताबा देण्याची याचिका एनआयएने केली होती. त्यावर जिल्हा न्या. आय.एस. मेहता यांनी आरोपींचा ताबा एनआयएकडे देण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या ओबैग उर रहमान आणि या आरोपींना समोरासमोर आणून चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
हैदराबाद बॉम्बस्फोटाबाबत संपूर्ण चौकशी करण्यासाठी रहमान याला ताब्यात देण्याची मागणी केल्यानंतर १३ मार्च रोजी न्यायालयाने त्याला बंगलोर कारागृहातून एनआयएच्या ताब्यात दिले.
रहमान हा इंडियन मुजाहिदीनचा महत्त्वाचा सदस्य असून हैदराबाद स्फोटप्रकरणी बंदी घातलेल्या या संघटनेच्या इतर सदस्यांची तसेच इतर महत्त्वाची माहिती त्याच्याकडून मिळवायची असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले होते. तसेच मकबूल आणि इम्रान यांनीदेखील महत्त्वाची माहिती दिली असून या आरोपींना समोरासमोर आणून चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:06 pm

Web Title: hyd blasts nia granted 4 days custody of two im operatives
Next Stories
1 मराठी जगत
2 सीआरपीएफ छावणीवरील आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी संशयिताला पकडले
3 भारतातील इटलीच्या नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
Just Now!
X