05 March 2021

News Flash

Video: लोकल आणि एक्सप्रेसची धडक; थरकाप उडवणारा अपघात CCTV मध्ये कैद

अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

CCTV

सोमवारी तेलंगणातील काचेगुडा रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात सुमाऱे १६ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे. काँगो इंटरसिटी एक्स्प्रेस ही काचेगुडा रेल्वे स्थानकात ज्या प्लॅटफॉर्मवर थांबली होती त्याच प्लॅटफॉर्मवर एमएमटीएम रेल्वे गाडी आली आणि या दोन्ही गाड्यांमध्ये टक्कर झाली. सिग्नलमधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचा अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन रेल्वे गाड्यांपैकी एक एमएमटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस होती. सुदैवानं रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर दोन्ही रेल्वे गाड्या या कमी वेगात होत्या, अन्यथा भीषण अपघात होऊ शकला असता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 10:39 am

Web Title: hyderabad collision between mmts and passenger train caught on cctv camera scsg 91
Next Stories
1 Xiaomi Redmi Note 8 चा सेल, 1120 जीबी 4G डेटाची ऑफर
2 ‘पवारांनी कमळ बघितलं आणि तुमचा माज उतरवला’; राष्ट्रवादी समर्थकांचा फडणवीसांना टोला
3 लहानग्या मुलीचा हा फोटो सात सेकंद निरखून पाहा, अन् जाणून घ्या ‘इमोशनल स्टोरी’
Just Now!
X