X
X

Video: लोकल आणि एक्सप्रेसची धडक; थरकाप उडवणारा अपघात CCTV मध्ये कैद

READ IN APP

अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

सोमवारी तेलंगणातील काचेगुडा रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात सुमाऱे १६ प्रवाशी जखमी झाल्याचे वृत्त आहे. काँगो इंटरसिटी एक्स्प्रेस ही काचेगुडा रेल्वे स्थानकात ज्या प्लॅटफॉर्मवर थांबली होती त्याच प्लॅटफॉर्मवर एमएमटीएम रेल्वे गाडी आली आणि या दोन्ही गाड्यांमध्ये टक्कर झाली. सिग्नलमधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचा अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम सीटीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन रेल्वे गाड्यांपैकी एक एमएमटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस होती. सुदैवानं रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर दोन्ही रेल्वे गाड्या या कमी वेगात होत्या, अन्यथा भीषण अपघात होऊ शकला असता.

22
X