News Flash

Hyderabad municipal elections 2020 : टीआरएस पहिल्या, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

प्रादेशिक पक्षाला पर्याय निर्माण केल्याचा भाजपचा दावा

| December 5, 2020 02:21 am

प्रादेशिक पक्षाला पर्याय निर्माण केल्याचा भाजपचा दावा

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत शुक्रवारी रात्रीपर्यंत १५० पैकी १४६ विभागांमधील निकाल जाहीर झाले. सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) ५६ जागा पटकावून आघाडीवर आहे. भाजप ४६ जागा पटकावून दुसऱ्या क्रमांकावर असून एआयएमआयएम ४२ जागा पटकावून तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने केवळ दोन जागांवर विजय मिळविला आहे.

भाजपने ४६ जागा पटकावून या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएस या प्रादेशिक पक्षाला  भाजपने आपला पर्याय निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. हा भाजपचा ‘सॅफ्रॉन स्ट्राइक’ असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याचे टीआरएसने मान्य केले आहे, मात्र पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव म्हणाले की, निकालामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही. टीआरएसला सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने चार वर्षांपूर्वी १५० पैकी ९९ जागा पटकावून बाजी मारली होती. या निवडणुकीत ७४.६७ मतदारांपैकी केवळ ३४.५० लाख मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता, मतदानाची टक्केवारी ४६.५५ टक्के इतकी होती.

‘एआयएमआयएम’चे बालेकिल्ल्यात वर्चस्व

असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमने ३४ जागा पटकावून आपल्या पारंपरिक बालेकिल्ल्यात वर्चस्व कायम ठेवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:21 am

Web Title: hyderabad election result trs wins ghmc elections but bjp is on second position zws 70
Next Stories
1 भारतीय वंशाची संशोधक ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची मानकरी
2 देशात लस काही आठवडय़ांत
3 ‘शेतकचरा जाळणे बंद; तरी दिल्ली प्रदूषितच’
Just Now!
X