हैदराबादमध्ये बांधकाम सुरु असलेली पाच मजली इमारत कोसळल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीच्या ढिगा-याखाली दहा ते बारा जण अडकल्याचे वृत्त असून घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले आहे. अ

नानाक्रमगुडा येथे पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. गुरुवारी रात्री ही इमारत कोसळली. इमारतीच्या तळमजल्यावर सुरक्षारक्षक, त्याचे कुटुंब आणि काही कामगार राहत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ढिगा-याखाली किमान दहा ते बारा जण अडकले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. इमारत कोसळली तेव्हा परिसरात जोरात आवाज आला आणि भीतीपोटी इमारती लगत राहणारे लोक घाबरुन घराबाहेर पळत आले अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. हैदराबादमधील अग्निशमन यंत्रणा, आपातकालीन पथक तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती महापालिकेचे आयुकत जनार्दन रेड्डी यांनी दिली.