21 October 2020

News Flash

दोन मित्रांमध्ये पैशांवरुन वाद, एकाने चावलं दुसऱ्याचं नाक

हैदराबादमध्ये हा प्रकार घडला आहे

एखाद्याने नाक कापलं अशी म्हण अनेकदा वापरली जाते. अब्रू घालवली, प्रतिष्ठा धुळीला मिळवली असा या म्हणीचा अर्थ आहे. मात्र हैदराबादमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचं नाक चावलंय. पैशांवरुन झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या नाकाचा एवढा जोरात चावा घेतला की त्याच्या नाकाचा तुकडा पडला. वेणूगोपाल रेड्डी असं जखमी झालेल्या माणसाचं नाव आहे.

वेणूगोपाल रेड्डी हा हैदराबाद येथील एस. आर. नगर भागात वास्तव्य करतो. त्याला बुधवारी गांधी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं कारण त्याच्या नाकाचा तुकडा पडल्याने तो जखमी झाला होता. त्याला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा पैशांच्या वादातून मित्राने माझ्या नाकाचा चावा घेतला असं त्याने सांगितलं.

बुधवारी वेणूगोपाल आणि रमेश हे दोघेजण मद्यपान करत होते. त्यावेळी या दोघांमध्ये पैशांवरुन वाद झाला. ज्यानंतर रमेशने वेणूगोपालच्या नाकाचा चावा घेतला. वेणूगोपालने काही दिवसांपूर्वी रमेशकडून उसने पैसे घेतले होते. मात्र काही कारणामुळे तो ते परत देऊ शकला नाही. जेव्हा रमेश आणि वेणूगोपाल मद्यपान करण्यासाठी बसले तेव्हा वेणूगोपालकडून आपल्याला पैसे येणं आहे हे रमेशला आठवलं. त्या पैशांवरुन या दोघांमध्ये वाद सुरु झाला. या वादाचं रुपांतर भांडणात झालं आणि त्याच भांडणात रमेशने वेणूगोपालचं नाक चावलं ज्यामुळे त्याच्या नाकाचा तुकडाच पडला. एवढंच नाही तर वेणूगोपालला रमेशने मारहाणही केली. The News Minute ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. या प्रकरणी रमेश विरोधात एस आर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 5:58 pm

Web Title: hyderabad man bites off part of friends nose over financial dispute booked scj 81
Next Stories
1 हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी पकडला
2 येत्या एक फेब्रुवारीपासून स्थानिक गोवेकरांना कॅसिनोमध्ये प्रवेशबंदी
3 अर्णब गोस्वामीच्या ऑफिसबाहेर कुणाल कामराची पोस्टरबाजी, म्हणाला…
Just Now!
X