हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक तपासासाठी पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी नेलं होतं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु ते न थांबल्यानं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता ही घटना घडली. माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, चकमकीची घटना ऐकून आपल्याला धक्का बसला. परंतु आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितीच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

ही जी घटना झाली होती त्यानंतर संपूर्ण देशातच संतापाची लाट होती. प्रत्येक बलात्काराच्या आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे. फाशीच्या शिक्षेला बराच कालावधी लागला असता. हे आरोपी ठार झाले आहेत. खऱ्या अर्थानं पीडितेला न्याय मिळाला. ते सुटले असते तर त्यांनी पुन्हा काही वाईट कृत्य केलं असतं. ही खऱ्या अर्थानं पीडितेला श्रद्धांजली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते तर पुन्हा अशी घटना घडली असती, असं मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hyderabad rape case police four accused encountered jud
First published on: 06-12-2019 at 07:45 IST