News Flash

हैदराबाद बॉम्बस्फोट खटला: दोघांना फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा

वर्ष २००७ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोघांना फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

अकरा वर्षांपूर्वी म्हणजे २५ ऑगस्ट २००७ रोजीची हैदराबादमधील ती सांयकाळ कोणीच विसरू शकणार नाही. एकापाठोपाठ एक अशा दोन बॉम्बस्फोटात तब्बल ४२ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. (संग्रहित छायाचित्र)

वर्ष २००७ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोघांना फाशी तर एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अनिक शफिक सईद आणि इस्माईल चौधरी यांना फाशी तर तारिक अंजुम याला जन्मठेप सुनावण्यात आली. सोमवारी सायंकाळी विशेष न्यायालयाने यावर निकाल दिला. तर फारूख शर्फूद्दीन तरकश आणि मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तारिकविरोधात पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी त्याच्यावर खटला चालवण्यात आला होता. त्याला आज सकाळीच दोषी ठरवण्यात आले होते.

हैदराबादमधील गोकूळ चाट आणि लुंबिनी पार्क येथे २५ ऑगस्ट २००७ रोजी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटात ४२ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी हैदराबादमधील एनआयएच्या विशेष न्यायालयात खटला चालवण्यात आला. तेलंगण पोलिसांनी या प्रकरणात दोन वेळा पुरवणी आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात १७९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मोहम्मद अकबर इस्माइल चौधरी, अनिक शफिक सईद, फारुख शर्फूद्दीन, मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख आणि तारिक अंजूम अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत. पाचही आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.

दरम्यान, फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अनिक सईदच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 6:33 pm

Web Title: hyderabad twin blasts case two accused aneeq sayeed and ismail chaudhary awarded death sentence and tariq anjum sentenced to life imprisonment
Next Stories
1 इंधनाचे दर वाढले तर खर्च कमी करा, भाजपा मंत्र्याचा जनतेला सल्ला
2 FB बुलेटीन: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा भारत बंद आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या
3 सुष्मिता सेनने मुकूट घातलेल्या ‘मिस युनिव्हर्स’चं कर्करोगाने निधन
Just Now!
X