News Flash

पंतप्रधान पदासाठी मीच उत्तम- आझम खान

मुलायम यांचाही आपल्याला पाठिंबा राहिल, असा दावा देखील केला.

कानपूर येथे बोलत असताना आझम खान यांनी पंतप्रधान होण्याची आपली इच्छा व्यक्त करून दाखवली.

पंतप्रधान पदासाठी आपणच योग्य उमेदवार असल्याचा दावा करत उत्तर प्रदेशातील मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांचीच गोची केली आहे. कानपूर येथे बोलत असताना आझम खान यांनी पंतप्रधान होण्याची आपली इच्छा व्यक्त करून दाखवली. मुलायम यांचाही आपल्याला पाठिंबा राहिल, असा दावा देखील केला.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यास आणि सर्व खासदारांनी पंतप्रधानपदी माझी निवड केल्यास देशात चांगला संदेश जाईल. देश दिवसेंदिवस प्रगती करेल. एवढेच नाही तर वेळ येईल तेव्हा मुलायम सिंह हेच पंतप्रधान पदासाठी स्वत:हून माझे नाव सुचवतील, असे आझम खान म्हणाले.
आझम खान यांना उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी करणारे पोस्टर्स लखनऊमध्ये झळकत असल्याबाबत प्रश्न विचारला असता आझम खान यांनी उपमुख्यमंत्री नाही तर आपण पंतप्रधान होण्याच्या लायक असल्याचे सांगितले. त्यामुळे मीच ते पोस्टर्स उतरविण्यास देखील सांगितले, असेही आझम खान म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 1:32 pm

Web Title: i am fittest person to become pm says azam khan
टॅग : Azam Khan
Next Stories
1 दिल्ली क्रिकेटमधील गैरप्रकारांच्या चौकशीला जेटली का घाबरताहेत? – केजरीवाल
2 पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचा भार सामान्यांवर का? – आनंद शर्मांचा सवाल
3 दिल्लीत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक
Just Now!
X