News Flash

निवडणूक जिंकताच समोर आली जो बायडन यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

ट्विट करुन मानले अमेरिकेतल्या नागरिकांचे आभार

जो बायडन यांनी अमरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. निवडणूक जिंकल्याचं कळताच पहिलं ट्विट करुन त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडलं हा मी माझा बहुमान समजतो असं जो बायडन यांनी आपल्या निवडणूक जिंकल्यानंतरच्या पहिल्यावहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात झालेली ही निवडणूक आणि त्याचा लागणारा निकाल याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. व्हाइट हाऊसमध्ये येत्या काही दिवसातच जो बायडन यांचा शपथविधी होईल.

जो बायडन यांनी काय म्हटलं आहे?
अमेरिकेने मला राष्ट्राध्यक्ष केलं हा मी माझा बहुमान समजतो. आपल्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मला ज्यांच्यामुळे मिळाली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. अमेरिकेपुढे जी आव्हानं आहेत त्यांना समर्थपणे तुमच्या साथीने सामोरं जाईन. तुम्ही मला मत दिलं असो वा नसो मी सगळ्या नागरिकांसाठीच माझं कार्य करेन. तुम्ही मला ज्या विश्वासाने या ठिकाणी बसवलं आहे तो विश्वास सार्थ ठरवेन या आशयाचं ट्विट जो बायडन यांनी केलं आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर मतमोजणी आणि निकाल येणं ही प्रकिया काहीशी लांबली. सुरुवातीला अटीतटीची वाटणाऱ्या निवडणूक निकालाचं चित्र नंतर बऱ्यापैकी स्पष्ट झालं. जो बायडन यांना २६४ इलेक्ट्रोल मतं मिळाली आणि त्यानंतर आणखी २० मतं मिळाल्यानं त्यांच्या इलेक्ट्रोल मतांची संख्या २८४ झाली. विजयासाठी २७० इलेक्ट्रोल मतांची आवश्यकता असते मात्र बायडन यांना एकूण २८४ इलेक्ट्रोल मतं मिळाली आणि त्यांचा विजय निश्चित झाला. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील यात काहीही शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 10:44 pm

Web Title: i am honored that you have chosen me to lead our great country says joe biden after victory scj 81
Next Stories
1 US Election : जो बायडन यांचा विजय, राष्ट्राध्यक्ष म्हणून घेणार शपथ
2 US Election : राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3 Bihar Elections 2020 Exit Poll : बिहारमध्ये सत्तापालटाचा अंदाज; राजद-काँग्रेसला जनतेचा कौल
Just Now!
X