अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांतील प्रवाशांविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात स्पष्टीकरण दिले आहे. मी वर्णद्वेषी नाही असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यात द्वीपक्षीय समूहाच्या सदस्यांसोबत एक बैठक पार पडली.

या बैठकीत सहभागी झालेले काही हीन दर्जाचे देश त्यांच्या देशातील नागरिकांना अमेरिकेत येऊ देण्यासाठी दबाव टाकत आहेत असे ट्रम्प यांनी म्हटल्याचा कथित आरोप त्यांच्यावर आहे. मात्र माझ्यावर अकारण हे आरोप केले जात असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच मी वर्णद्वेषी नाही असे म्हणत हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

फ्लोरिडा या ठिकाणी नेते केवि मॅक्कार्थींसोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री जेवणाला जायचे ठरवले होते. त्याआधीच पत्रकारांशी बोलताना मी वर्णद्वेषी नाही, आजवर तुम्ही ज्या ज्या लोकांना वर्णद्वेषी समजत होतात त्यांच्या दोषी लोकांच्या यादीत माझे नाव समाविष्ट करू नका असेही त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या राजकीय विरोधकांनी ते वर्णद्वेषी आहेत असा आरोप केला होता. तसेच त्यांच्या कथित वक्तव्यावरून वादही निर्माण केला होता. याच सगळ्या आरोपांना ट्रम्प यांनी थेट उत्तर दिले आहे.