यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पाहणी नंतर घेतलेल्या आढावा बैठकीस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशीराने आल्याने, पंतप्रधानांना वाट पाहावी लागल्याचे समोर आले. या मुद्यावरून आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी व मोदी सरकारमध्ये नव्या वादाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. या संदर्भात भाजपाकडून टीका होऊ लागल्यानंतर आता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून देखील प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. तसेच, जनतेच्या हितासाठी मी पंतप्रधान मोदींचे पाय धरायलाही तयार आहे, मात्र सूडाचे राजकारण बंद करा. असं ममता बॅनर्जींनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर आरोप देखील केले आहेत. ही बैठक मला अपमानित करण्यासाठी होती. मी पंतप्रधान मोदींना वाट पाहायला नाही लावली, उलट मलाच पंतप्रधानांना भेटण्यासाठी वाट पाहावी लागली, असं ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मला वाईट वाटलं. पीएमओने प्रसारित केलेली एकतर्फी माहिती चालवून त्यांनी माझा अपमान केला. जेव्हा मी काम करत होते, तेव्हा ते हे करत होते. जनतेच्या हितासाठी मी तुमचे पाय धरयला तयार आहे. मात्र हे सूडाचे राजकारण थांबवा.”

तसेच, “मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, अशाप्रकारे माझा अपमान करू नका. बंगालला बदनाम करू नका. माझे CS, HS आणि FS प्रत्येक वेळी बैठकीत सहभागी होत आहेत. ते केंद्रासाठी काम करत आहेत, ते राज्यासाठी कधी नोकरी करणार? तुम्हाला वाटत नाही का? हा राजकीय प्रतिशोध आहे.” असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.

“आमची काय चूक होती? मागील दोन वर्षांत विरोधी संसदीय विरोधी नेत्यांची का आवश्यकता भासली नाही किंवा गुजरातमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना (बैठकीत) का बोलावलं जात नाही? जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यपालांनी कायदाव व सुव्यवस्थेबाबत भाष्य केलं व केंद्राची पथकं पाठवली गेली होती.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बोलून दाखवलं.

भाजपाकडून होत असलेल्या टीकेला तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उत्तर देत पलटवार केला.  “३० मिनिटं उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लशीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

“भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट बघा”

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला सत्तेत येऊन तीन आठवडे उलटत नाही, तोच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांना सीबीआयने अटक केल्यावरून ममतांनी केंद्रावर आगपाखड केली होती.