सेक्स सीडीमुळे चर्चेत आलेले स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. स्वामी नित्यानंद यांनी गाय, माकड, सिंग आणि इतर प्राणी भविष्यात तामिळ आणि संस्कृतमध्ये लोकांशी संवाद साधू शकतील असा दावा केला आहे. स्वामी नित्यानंद यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, वर्षभरात मी प्राण्यांच्या तोंडून संस्कृत आणि तामिळ भाषा वदवेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आश्रमातील एका कार्यक्रमात बोलताना नित्यानंद म्हणाले की, माकड आणि अन्य प्राण्यांचे आपल्या सारखे अंतर्गत ऑर्गन नसतात. आम्ही त्यांच्यासाठी अशा प्रकारचे इंनटर्नल ऑर्गन तयार करत आहे. संशोधन आणि विज्ञान मिळून एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरची टेस्ट घेतल्यानंतर मी असा दावा करतोय की, लवकरच प्राणी आणि व्यक्तीमध्ये तामिळ किंवा संस्कृतमध्ये संभाषण होईल.

व्हिडीओमध्ये स्वामींनी असा दावा केला आहे की, एक वर्षामध्ये माकड, सिंह, गाय आणि इतर प्राण्यांसाठी फोनेटिक आणि भाषांनी सक्षम असे व्होकल कार्ड तयार करत आहे. आम्ही असे सॉफ्टवेअर तयार करत आहे ज्याद्वारे गाय आणि बैल स्पष्टपणे तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलतील.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I can make cows speak in tamil and sanskrit says swami nithyananda
First published on: 19-09-2018 at 18:46 IST