News Flash

CAA : भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही : शाह

मध्य प्रदेशमधील जबलपुर येथे केलं वक्तव्य; राहुल गांधी व ममता बॅनर्जींना दिलं 'हे' आव्हान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसवाल्यांनो कान उघडे ठेवून नीट ऐका, तुम्हाला जेवढा विरोध करायचा आहे तेवढा करा, आम्ही सर्व लोकांना नागरिकत्व देऊनच शांत बसणार आहोत, भारतावर जेवढा अधिकार माझा तुमचा आहे तेवढाच अधिकार पाकिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध व ख्रिचन शरणार्थींचा देखील आहे. मध्य प्रदेशमधील जबलपुर येथे रविवारी एका रॅलीत ते भाषण करत होते.

यावेळी गृहमंत्री शाह यांनी हे देखील सांगितले की, आज काँग्रेस संपूर्ण देशभर सीएएचा विरोध करत आहे. मी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान करतो की, सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावण्याची तरतूद असल्याचे त्यांनी दाखवून द्यावे. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाहीतर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून कपिल सिब्बल त्यांना देखील टोला लगावला. कपिल सिब्बल म्हणतात की, राम मंदिर नाही बनवले पाहिजे, सिब्बल तुम्ही जेवढी ताकद असेल तेवढी लावून आम्हाला थांबण्याचा प्रयत्न करा, मात्र चार महिन्यात गगनस्पर्शी अशा भव्य राम मंदिराचे निर्माण होणार असल्याचे शाह यांनी बोलून दाखवले.

जेएनयूमध्ये काहीजणांनी भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरूंगात टाकायला हवं की नाही? असा प्रश्न करत, जे देशविरोधी घोषणाबाजी करतील त्यांची जागा तुरूंगात असेल. असा इशारा देखील गृहमंत्री शाह यांनी यावेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 5:13 pm

Web Title: i challenge mamata banerjee and rahul baba to find out a provision from caa that can take citizenship away from anyone in this country amit shah msr 87
Next Stories
1 ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकाचे भाजपा कार्यालयात प्रकाशन
2 देश ‘तालिबानी’ पद्धतीने चालवता येणार नाही : संजय राऊत
3 झारखंडमध्ये पाच नक्षलवाद्यांना अटक
Just Now!
X