News Flash

मी माझे कर्तव्य बजावले-मनमोहन सिंग

टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी माजी महालेखापाल विनोद राय यांनी टिकेची तोफ डागल्यानंतर आपण आपले कर्तव्य बजावले असून यापेक्षा आपल्याला अधिक काही सांगायचे

| September 15, 2014 01:11 am

टूजी स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी माजी महालेखापाल विनोद राय यांनी टिकेची तोफ डागल्यानंतर आपण आपले कर्तव्य बजावले असून यापेक्षा आपल्याला अधिक काही सांगायचे नाही, या शब्दांत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काहीही सांगण्यास रविवारी स्पष्टपणे नकार दिला.
कन्या दमण सिंग यांनी लिखित ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अ‍ॅण्ड गुरुशरण’ या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभात मनमोहन सिंग यांना पत्रकारांना गाठले असता, उपरोक्त बाब स्पष्ट केली. ‘मी माझे कर्तव्य बजावले असून, इतरांनी जे काही लिहिलेले आहे, त्याबद्दल आपल्याला काहीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही, असे मनमोहन सिंग म्हणाले. दमणसिंग यांनीही आपल्याला काहीही ठाऊक नसल्याचे सांगत राय यांच्या आरोपांसंबंधी बोलण्याचे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:11 am

Web Title: i did my duty says manmohan singh
टॅग : Manmohan Singh
Next Stories
1 राष्ट्रपती व्हिएतनाममध्ये
2 न्यूयॉर्कमध्ये नरेंद्र मोदींच्या स्वागताला ‘मिस अमेरिका’
3 ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किरीट जोशी यांचे निधन
Just Now!
X