19 September 2020

News Flash

मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं वाटत नाही : अधीर रंजन चौधरी

हे भाजापाचं सध्याचं राजकारण आहे; ज्योतिरादित्य शिंदेंना मंत्रिपदाची भुरळ पडली असावी, असं देखील म्हणाले आहेत.

मध्य प्रदेशमधील राजकीय भूकंपानंतर आता काँग्रेसच्या गोटातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या सरकारला भाजपाने मोठा सुरूंग लावला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार कोसळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. या राजकीय उलथापालथीवर काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशमधील आमचं सरकार वाचेल असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले आहेत.

होय खरोखरच आमच्या पक्षाचं नुकसान होईल आणि मला नाही वाटत मध्य प्रदेशमधील आमचे सरकार टिकेल. हे सध्याचे भाजपाचे राजकारण आहे. नेहमीच विरोधी सरकारचे पतन करण्याचा व त्याला अस्थिर करण्याचा ते प्रयत्न करतात.

शिंदे यांनी काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ पदं भूषवली जी की सन्मानजकन होती. कदाचित मोदीजींनी दिलेल्या मंत्रिपदाच्या ऑफरने त्यांना भुरळ पडली असावी. आम्हाला माहित आहे की त्यांचे कुटुंबाचा अनेक दशकांपासून भाजपाशी संबंध आहे, पण तरीही हे मोठे नुकसान आहे. असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या भेट घेतल्यानंतर, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरवर त्यांनी राजीनामा पोस्ट केला आहे. काँग्रेससाठी हा प्रचंड मोठा धक्का मानला जातो आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे तरुण नेतृत्व आहे. कायम डावललं गेल्याने शिंदे हे नाराज झाले होते. आता ते पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे स्वतःचा पक्ष काढून भाजपाला पाठिंबा देतात की भाजपात थेट प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 1:40 pm

Web Title: i dont think our govt in madhya pradesh will survive adhir ranjan chaudhary msr 87
Next Stories
1 ज्योतिरादित्य शिंदे : स्टॅनफोर्डमधून MBA, काँग्रेसमधील १८ वर्ष आणि आता…
2 मध्य प्रदेशच्या जनादेशाला उलटवण्याचं षडयंत्र : दिग्विजय सिंह
3 मोदी-शाह भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी सोडला काँग्रेसचा ‘हात’
Just Now!
X