News Flash

Feeling Well! करोनामुक्त होऊन लवकरच परतेन-ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट केला व्हिडीओ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगत लवकरच करोनामुक्त होऊन अमेरिकेची सेवा करण्यासाठी रुजू होईन असं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. मला बरं वाटावं म्हणून वॉल्टर रिड मेडिकल सेंटरचे डॉक्टर्स, नर्सेस हे प्रचंड मेहनत घेत आहेत. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या सगळ्यांचं कार्य पाहून मी थक्क झालोय. मागील सहा महिन्यात ज्या ज्या रुग्णांनी करोनावर मात केली त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अमेरिका ही एक महासत्ता आहे. जगात अमेरिकेचा दबदबा आहे या अमेरिकेसाठी मी लवकरच करोनामुक्त होऊन परत येईन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. ट्रम्प यांनीच आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आपण मास्क वापरणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र आता करोनाची लागण झाल्याने राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला फटका बसला आहे. ट्रम्प दाम्पत्याला सौम्य लक्षणं असली तरी ट्रम्प यांचे वजन जास्त असल्याने त्यांची विशेष काळजी घेतली जाते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 8:55 am

Web Title: i feel much better now we are working hard to get me all the way back says donald trump scj 81
Next Stories
1 एनसीबी उपसंचालकांना करोना, दीपिकासह इतर अभिनेत्रींची केली होती चौकशी
2 अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन
3 ‘आधीच्या सरकारांनी कृषी सुधारणांचे धाडस दाखवले नाही’
Just Now!
X