ईदच्या निमित्ताने तरूणांना जादूची झप्पी देणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. या मुलीचे नाव आलिशा मलिक असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र हा व्हिडिओ कसा आणि का व्हायरल झाला? हे ठाऊक नाही मी १०० मुलांना जादू की झप्पी दिली त्यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा काहीही हेतू नव्हता. मी फक्त ईद निमित्त मुलांना शुभेच्छा देत होते. मात्र माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि माझ्या कुटुंबाला आणि मला खूप त्रास झाला हा व्हिडिओ व्हायरल कसा आणि का झाला हे ठाऊक नाही असेही आलिशा मलिकने म्हटले आहे. एएनआयला तिने ही प्रतिक्रिया दिली आहे.

काय आहे प्रकरण?
ईदच्या निमित्ताने तरुणांना जादुची झप्पी देणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत तरुणी एका मॉलच्या बाहेर तरुणांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तरुणीकडून जादुची झप्पी मिळावी यासाठी तरुणांनी अक्षरक्ष: रांग लावली होती. तरुणीने जवळपास ५० तरुणांना जादुची झप्पी दिली. यावेळी तिथे उपस्थित कोणीही एक अनोळखी मुलगी अशाप्रकारे मिठ्या मारत असल्यावरुन आक्षेप घेतला नाही असं सुरक्षारक्षकांनी सांगितलं आहे. तरुणीसोबत तिच्या दोन मैत्रिणीही होत्या.

तरुणी जवळपास १० मिनिटे सर्वांना मिठी मारत होती. रांगेत उभ्या सर्व तरुणांना कोणतीही चिडचिड आणि घाई न करता तरुणी मिठी मारते. यावेळी तिथे उपस्थित काही लोक व्हिडीओ शूट करत असून, तिच्यासोबत सेल्फीदेखील काढत आहेत.

आता या व्हिडिओ वरून बरीच टीका झाल्यावर या मुलीने आपण प्रसिद्धीसाठी असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.