भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मी नि:शब्द झालोय, वाजपेयींच्या निधनाने मी शून्यात गेलो आहे. पण मनामध्ये भावनांचा उद्रेक होत आहे. आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले अटलजी आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी आपल्या जिवनातील प्रत्येक क्षण देशासाठी अर्पित केलाय. अटलजींच्या जाण्यानी एका युगाचा अंत झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून व्यक्त केली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अटल बिहारी वाजपेयी यांची “मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं ही कविता पोस्ट केली आहे.


‘वाजपेयी यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन प्रत्येक भारतीय आणि भाजपा कार्यकर्त्यांना सतत मिळत राहिल. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला देवो. ओम शांती! ‘ असे ट्टिट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही श्रद्धांजली अर्पण केली आहे. अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमवला, पण ते सदैव आमच्या हृदयात राहतील. अटलजी अमर आहेत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.